कोट्यवधीच्या फसवणूकप्रकरणी सनदी लेखापाल गुजरातमध्ये जेरबंद  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नाशिक - जमीन व प्लॉट विक्रीच्या मोबदल्यात नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना पक्के खरेदीखत न देता कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सनदी लेखापाल व बांधकाम व्यावसायिक शिरीष कुलकर्णी यास गुजरातमधून अटक केली. राहुल भार्गवे याने बेलगावढगा येथील प्लॉटच्या व्यवहारापोटी शिरीष कुलकणीला सहा लाख ४५ हजार रुपये दिले होते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर भार्गवे यांना पक्के खरेदीखत करून न देता त्यांच्या पैशांचा अपहार करत फसवणूक केली. 