आरटीओचे संकेतस्थळ हॅक करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नाशिक - गेल्या आठवड्यात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन फिटनेस प्रमाणपत्र यंत्रणा हॅक करणाऱ्या संशयिताला नाशिकच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक - गेल्या आठवड्यात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन फिटनेस प्रमाणपत्र यंत्रणा हॅक करणाऱ्या संशयिताला नाशिकच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

१९ ऑगस्टला आरटीओतील फिटनेस प्रमाणपत्राची यंत्रणा हॅक करून दोन गाड्यांचे प्रामाणपत्र बनवून आणल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. ज्या दोन वाहनांची (एमएच १५, ईजी ४५२१, एमएच १५, ईजी ४६२१) फिटनेस प्रमाणपत्रे करण्यात आली. ती वाहने सौम्या अर्थमूव्हर्स या नावाने खरेदी करण्यात आली होती. ही दोन्ही वाहने महिंद्र ॲन्ड महिंद्र फायनान्सने जप्त केली होती. त्यानंतर ती वाहने संशयित दीपक पटेल याने खरेदी केली होती. त्यानेच या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नाशिकच्या आरटीओमध्ये न आणता तयार केले. दोन्ही वाहने आंध्र प्रदेशातील कुरणाल येथे असल्याचे समजताच ती जप्त करण्यात आली. संशयित पटेल यास अटक करण्यात आली आहे. त्याला आज (३०) जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले व उचच न्यायालयाने जामीन...

02.18 PM

नाशिक - केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी योजना जाहीर करीत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणे दूरच, उलट...

01.21 PM

नाशिक - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारला....

01.12 PM