अयप्पा मंदिरातून सात दीपमाळा चोरीला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

जुने नाशिक - द्वारका परिसरातील अयप्पा मंदिरात तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच संशयितांनी सुरक्षारक्षकास हत्याराचा धाक दाखवून सुमारे दोन लाख किमतीच्या पितळी दीपस्तंभाच्या सात दीपमाळा चोरी केल्याची घटना उघडकीस आली. ब्रह्मानंदन परेरीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

द्वारका भागात मुख्य महामार्गाला लागून असलेल्या प्राचीन अय्यपा मंदिरात बीड व पितळापासून बनविलेले दीपस्तंभ होते. आज पहाटे तीनच्या सुमारास तोंडाला काळा कपडा बांधून छोटा हत्ती वाहनातून आलेल्या पाच संशयितांनी पुढील भागात असलेल्या भिंतीवरून मंदिर आवारात प्रवेश केला. 

दीपस्तंभावरील सात दीपमाळा लोखंडी खांबातून अलगद बाहेर काढल्या. शेवटची दीपमाळ काढताना तिच्या वजनाचा अंदाज न आल्याने चोरांच्या हातातून ती खाली कोसळली. आवाजाने जागे झालेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरांनी कोयता आणि विविध हत्यारांचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली अन्‌ पळ काढला. तोंडाला काळा कपडा बांधला असल्याने त्यांचा चेहरा दिसू शकला नाही. सर्व संशयित ३० ते ४० वयोगटांतील असण्याची शक्‍यता सुरक्षारक्षकांनी वर्तविली. चोरी गेलेल्या दीपस्तंभाची किंमत सुमारे दोन लाख असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. 
 
पहाटे मंदिराच्या बाहेर गाडी येऊन थांबली. या ठिकाणी विविध प्रकारचे गॅरेज असल्याने वाहने थांबतात. त्यामुळे त्या वाहनावर संशय आला नाही. परंतु चोरांनी त्याच वाहनांचा वापर केला.
- शेरसिंग, सुरक्षारक्षक

उत्तर महाराष्ट्र

पंचवटी - आम्ही पोलिस असून, तुमच्या घरात राहात असलेल्या मुली वेश्‍याव्यवसाय करतात, असे समजल्यावरून कारवाई करण्यासाठी आलो आहोत....

02.00 PM

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू व डेंगीचा विळखा पडला असताना त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी महापालिकेत बहुमत असलेल्या सत्ताधारी...

02.00 PM

पंचवटी - त्र्यंबकेश्‍वर परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली. खबरदारीचा उपाय म्हणून...

02.00 PM