पंचवीस हजार थकबाकीरांकडून नऊ कोटींचा कर तिजोरीत जमा

पंचवीस हजार थकबाकीरांकडून नऊ कोटींचा कर तिजोरीत जमा

नाशिक - महापालिकेकडे घरपट्टी व पाणीपट्टीची बिले वाटण्यासाठी मनुष्यबळ नसताना थकबाकीदार ठरवून ६७ हजार ग्राहकांना नोटिसा पाठविल्या होत्या. त्यातील २५ हजार थकबाकीदारांनी कर अदा केल्याने आठ कोटी ७८ लाख रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला. 

नोव्हेंबरअखेरपर्यंत मालमत्ता करातून ५९ कोटी रुपये प्राप्त झाले असून, पाणीपट्टीतून आतापर्यंत २३ कोटी ५८ लाख रुपये महसूल प्राप्त झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा कोटी रुपयांनी महसूल वाढला आहे. चालू वर्षात मालमत्ता कर ६०, तर पाणीपट्टी कराची वसुली ४७ टक्के झाली आहे. 

महापालिकेने चालू वर्षी मालमत्ता करातून ११० कोटी, तर पाणीपट्टीतून ५० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. वसुलीसाठी महापालिकेने सवलत योजना राबविली. मागील वर्षी मालमत्ता करातून नोव्हेंबरपर्यंत ५६ कोटी ९५ लाख रुपये मिळाले होते. यंदा त्यात सव्वादोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. पाणीपट्टीतून ५० कोटी रुपये प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यांपैकी आतापर्यंत २३ कोटी ५८ लाख रुपये प्राप्त झाले. मागील वर्षी नोव्हेंबरपर्यंत १३ कोटी ५३ लाख रुपये महसूल मिळाला होता. यंदा त्यात दहा कोटी रुपयांनी वाढ झाल्याची माहिती विविध कर विभागाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com