ज्ञानेश्‍वरी आता ब्रेल लिपीतही

हर्षदा देशपांडे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नाशिक  - सकारात्मक ज्ञानाचा स्रोत म्हणून ज्ञानेश्‍वरी मराठी बांधवांसाठी वंदनीय आहे. ज्ञानेश्‍वरी घरात नाही असा मराठी माणूस सापडणे अशक्‍य. ज्ञानेश्‍वरीचे हे अगाध ज्ञान अंधबांधवांसाठीही खुले व्हावे, यासाठी ज्ञानेश्‍वरी ब्रेल लिपीत रूपांतरित करण्याचा प्रयत्न अरुण भारस्कर या अंधबांधवाने केला.

नाशिक  - सकारात्मक ज्ञानाचा स्रोत म्हणून ज्ञानेश्‍वरी मराठी बांधवांसाठी वंदनीय आहे. ज्ञानेश्‍वरी घरात नाही असा मराठी माणूस सापडणे अशक्‍य. ज्ञानेश्‍वरीचे हे अगाध ज्ञान अंधबांधवांसाठीही खुले व्हावे, यासाठी ज्ञानेश्‍वरी ब्रेल लिपीत रूपांतरित करण्याचा प्रयत्न अरुण भारस्कर या अंधबांधवाने केला.

अरुण भारस्कर यांनी आपल्यासारख्याच अंधबांधवांसाठी काहीतरी करता यावे, या उद्देशाने ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून अंधबांधवांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. ज्ञानेश्‍वरीतील ज्ञान आजही अभ्यासले जाते. कीर्तन, निरूपणाच्या माध्यमातून अनेक अंधबांधवांना ज्ञानेश्‍वरी ऐकता येते. मात्र, ज्ञानेश्‍वरी वाचन किंवा ज्ञानेश्‍वरीला अभ्यासणे यासाठी मात्र जास्त साधने उपलब्ध नाहीत, हे जाणून त्यांनी ज्ञानेश्‍वरी ब्रेल लिपीत तयार करण्यास सुरवात केली. 

ज्ञानेश्‍वरीत जगण्याचे सार आहे. दैनंदिन आयुष्यात अंधबांधवांना येणारे नैराश्‍य दूर करण्यासाठी ज्ञानेश्‍वरीचा निश्‍चितच उपयोग होणार आहे. त्यामुळे ती ब्रेल लिपीत रूपांतरित करण्यासाठी त्यांनी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केला. सुरवातीला ज्ञानेश्‍वरीतील बारावा, पंधरावा, सोळावा आणि अठरावा अध्याय अंधांसाठी वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. अठराव्या अध्यायात तर ज्ञानेश्‍वरीचे सार आहे. त्यामुळे या अध्यायांना प्रसिद्ध करण्यास प्राधान्य  देण्यात येईल. 

रचनात्मक बाबींवर भर
पहिल्या तीन अध्यायांना शंभर पाने, तर अठराव्या अध्यायासाठी ८० पाने लागली आहेत. त्यामुळे संपूर्ण ज्ञानेश्‍वरी ही ब्रेल लिपीत रूपांतरित केली असती तर तिचे स्वरूप मोठे झाले असते. मुंबईचे महेंद्र मोरे यांनी मंगल फॉन्टमध्ये ब्रेल तयार करून दिला आहे. ठाणे रोटरी क्‍लबच्या माध्यमातून मिळालेल्या देणगीतून पुस्तकाच्या छपाईचा खर्च केला जाईल. सुरवातीला ४०० कॉपी तयार केल्या जातील. ५० रुपये स्वागतमूल्य ठेवण्यात येणार आहे.

Web Title: nashik news Dnyaneshwari now in Braille script

टॅग्स