बंगाली बांधवांच्या दुर्गोत्सवाला प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नाशिक रोड - गांधीनगर येथील बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा उत्सवाचे उद्‌घाटन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते झाले. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, रतन लथ, गांधीनगर मुद्राणालयाचे व्यवस्थापक ए. के. सक्‍सेना, जी. डी. वर्मा, एल. पी. पाथरे, अरविंद चौथे, किरण पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन आदी उपस्थित होते. 

गांधीनगर येथील बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा उत्सवाचे हे 64 वे वर्ष आहे. येथे दुर्गामाता आणि गणपती, सरस्वती, महालक्ष्मी व कार्तिकस्वामींच्या आकर्षक मूर्ती आहेत. 

सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता, उपाध्यक्ष दीपक घोष, खजिनदार बिरूदास गुप्ता, शंकर डे महिला मंडळाच्या डॉ. रिता कुंडू, श्‍वेता गुप्ता, रिना घोष, अशोक सरकार, आर. सी. नंदन, अंजुदास गुप्ता, सुप्रिया मुखर्जी, पी. के. दास, अकाश दास, गौरव घोष, अरुण सोनार, हरपित मंडल, चौताली विश्‍वास, एम. वेदनाथ यांनी संयोजन केले. बांधवांच्या उपस्थितीत आज सकाळी विविध पूजा झाली. बंगालहून आलेल्या पुजाऱ्यांनी मंत्रोच्चारात देवीची प्रतिष्ठापना केली. दररोज सकाळ-सायंकाळ देवीची पूजा, आरती केली जाणार आहे. देवीची मूर्ती बंगालमधील कलाकारांनी गंगा नदीची माती आणून गांधीनगर येथेच घडविली आहे. तीन दिवस विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील हा सर्वांत मोठा दुर्गा उत्सव असून, दररोज सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 

Web Title: nashik news Durgotsav