'सीटू'मुळे कामगारांना घसघशीत बोनस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नाशिक - अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये बोनस आणि वेतनवाढीचे करार रखडलेले असताना "सीटू'ने यंदा नऊ कंपन्यांत बोनसचे घसघशीत करार करत कामगारांना किमान वीस ते चाळीस हजारांची दिवाळी भेट मिळवून दिली.

नाशिक - अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये बोनस आणि वेतनवाढीचे करार रखडलेले असताना "सीटू'ने यंदा नऊ कंपन्यांत बोनसचे घसघशीत करार करत कामगारांना किमान वीस ते चाळीस हजारांची दिवाळी भेट मिळवून दिली.

"सीटू' एकीकडे धडाधड करार करत असताना अन्य कामगार संघटना अद्यापही मौनात असल्याने मोठ्या कंपन्यांच्या कामागारांमध्ये चलबिचल सुरू आहे. दिवाळी जवळ आल्याने सर्वच कामगारांना आता बोनसचे वेध लागले आहेत. नाशिक जिल्ह्यात सातपूर अंबड, गोंदे, इगतपुरी, दिंडोरी, मालेगाव, सिन्नर येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती विकसित झाल्या आहेत. त्यात 60 हजारांवर कामगार कार्यरत आहेत. मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्यांमध्ये कामगारांना बोनस देताना कंपन्यांच्या मालकांनी विविध कारणे सांगून हात आखडता घेतला असला, तरी मध्यम आणि छोट्या आकाराच्या कंपन्यांमध्ये बोनसचे करार शांततेत होऊन रक्‍कमही कामगारांना मिळत आहे. साधारण कोजागरीपासून कामगारांना बोनस हाती मिळण्यास सुरवात होते.

सध्या "सीटू' संलग्न कामगार संघटनांचे बोनसचे करार यशस्वी झाले असून, तीन-चार दिवसांत त्या बोनसची रक्‍कम कामगारांना मिळणार आहे. हे करार यशस्वितेसाठी "सीटू'चे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

असा मिळणार बोनस (आकडे रुपयांत)
सोमेश फोर्जिंग - 18500 ते 25600
इप्कॉस इंडिया लि. - 23000 ते 37000
गोल्डी प्रिसीजन - 20,000
सिप्रा इंजिनिअरिंग युनिट 1 - 17000 ते 40000
क्‍लासिक फूड्‌स - 20000
शेरीन ऑटो - 18000
सागर इंजिनिअरिंग - 11500
सुयोग रबर - 20000 ते 27000
विराज इंडस्ट्रीज - 14 टक्के

टॅग्स