पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आरोग्य विद्यापीठातर्फे मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नाशिक - एम.एस्सी. इन फार्मास्युटिकल मेडिसीन, हेल्थ केअर ऍडमिनीस्ट्रेशन व मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुदतवाढीनंतर या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी सोमवार (ता. 10)पर्यंत अर्ज करू शकणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रसिद्धिपत्राद्वारे दिली. औषधनिर्माण उद्योगाला आवश्‍यक असणारे महत्त्वपूर्ण कौशल्य व विषयांचा अंतर्भाव असलेला, तसेच मेडिकल रायटिंग, मेडिकल कोडिंग, फार्माकोव्हिजिलन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, मेडिको मार्केटिंग अफेअर्स, क्‍लिनिकल रिसर्च, क्‍लिनिकल डाटा मॅनेजमेंट यांसारख्या नव्या औद्योगिक जगताला पूरक बाबींचा समावेश एम.एस्सी. इन फार्मास्युटिकल मेडिसीन या दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात केला आहे. अभ्यासक्रमासह अन्य माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.