कर्जमाफीच्या प्रारंभातून गरजू शेतकऱ्यांचा दिवाळीला सन्मान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुख्यमंत्र्याचे भाषणाचे प्रसारण 
कार्यक्रमात शेतकरी दाम्पत्यांना टॉवेल टोपी, व साडी चोळी आणि कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देउन प्रातिनिधीक स्वरुपात गौरविण्यात आले. या दरम्यान मुंबईतील मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले. 

नाशिक : दृष्काळ व गारपिटीने सलग 3 वर्षे फटका बसलेल्या नाशिकमध्ये सुमारे पावने दोन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा होणार आहे. लोकांचा पैसा 
गरजू व प्रामाणिक शेतकऱ्यांपर्यत पोहोचतो आहे. त्यामुळे कर्जमुक्तीचा प्रारंभ ही दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी ठरावी. असे प्रतिपादन केंद्रीय 
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेर्तंगत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील 30 शेतकरी दाम्पत्यांचा आज डॉ.भामरे यांच्या हस्ते 
प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, महसूल उपायुक्त व प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, आमदार बाळासाहेब सानप, प्रा.देवयानी फरांदे, सिमा हिरे, डॉ.राहूल हिरे,निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहकार निबंधक निळकंठ करे आदी उपस्थित होते. 

डॉ.भामरे म्हणाले की, राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकरी केंद्रबिंदू मानून रयतेचे राज्य अभिप्रेत होते. आज दिवाळीच्या निमित्ताने गरजू व प्रामाणिक अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सन्मान होतो आहे. ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी दिवाळी म्हटली पाहिजे. राज्यात भाजप प्रणित सरकारने शाश्‍वत शेतीच्या विकासासाठी अनेक महत्वाची कामे केली. जलयुक्त शिवार योजनेतून 20 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणले. 15 हजार खेड्याचा पाणीप्रश्‍न सोडविला राज्यातील 26 रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासोबतच, नाशिकच्या नारपार मांजरपाडा-2 प्रकल्पासाठी ना हरकत दाखला मिळविला आहे. आतापर्यत शेतकऱ्यांच्या विकासासाठी योजना आल्या. पण त्याचा जिल्हा बॅकांना लाभ झाला. यावेळी मात्र, अपात्रांना लाभ मिळू नये. तसेच प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्यांना 25 हजाराची मदत दिली जात असल्याने खऱ्या अर्थाने गरजू व प्रामाणिक शेतकऱ्यांपर्यत लाभ पोहोचणार असल्याचे सांगितले. तर प्रभारी जिल्हाधिकारी गावडे यांनी, जिल्ह्यात 1 लाख 74 हजार 525 शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज अपलोड केले. त्यासाठी 1040 केंद्र उघडले होते असे सांगितले. 

मुख्यमंत्र्याचे भाषणाचे प्रसारण 
कार्यक्रमात शेतकरी दाम्पत्यांना टॉवेल टोपी, व साडी चोळी आणि कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देउन प्रातिनिधीक स्वरुपात गौरविण्यात आले. या दरम्यान मुंबईतील मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले. 

30 दाम्पत्यांचा सन्मान 
कविता व संजय रामनाथ निमसे (नाशिक), वैशाली व अरुण आहिरे, शांताबाई व अंबर धोंडू वळख (मालेगाव), वेणूबाई व विश्‍वनाथ केदारे (चांदवड), दगूबाई व सुकदेव साबळे, चंद्रकला व भास्कर चंदन (देवळा), जिजाबाई व पुंजाराम सोनू वाघ, राधाबाई व रामचंद्र मोरे (सटाणा), रामदास मोतीराम थेल, मन्साराम रामचंद्र जगताप, (कळवण 
ठकूबाई व बाळू देवराम लिलके, हौसाबाई व वाळू बेंडू गोतरणे (दिंडोरी), सविताबाई व जयराम मोहीनीराज गवळी, सुरेखा व गणेश महाले (पेठ), मैनाबाई व रामदास दळवी 
पारीबाई व मंगळु काशीराम चव्हाण (सुरगाणा), येणूबाई व राजाराम पासलकर, सुनिता व केशव सखाराम दिवटे (इगतपुरी), भगवान पांडुरंग गांगुर्डे, जनार्दन पांडूरंग गांगुर्डे 
(त्र्यंबकेश्‍वर), सुमन व त्र्यंबक निवृत्ती कुटे, शिला व केदू डावरे, (सिन्नर), कविता व उत्तम रामचंद्र आहिरे, निर्मला व सुदाम पुंजाबा पवार (नांदगाव), सुनिता व श्रावण 
जेजुरकर, सविता व वसंत राणे (येवला), निर्मला बाबूराव खालकर, छाया व सुदाम आहिरे (निफाड)