कसमादेतील शेतकरी पुत्राला मुख्यमंत्री भेटले स्वीडनमध्ये

खंडू मोरे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नुकत्याच स्वीडनची राजधानी स्टोकहोम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय "मेक इन इंडिया" कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सुभाष देसाई,केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.एका शेतकऱ्याच्या मुलाने एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात देश्याच्या व राज्याच्या प्रमुख  नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे योगेशने सांगितले.

खामखेडा : स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पिंगळवाडे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील शेतकरी पुत्र योगेश विश्वास भामरे यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. सटाणा सारख्या ग्रामीण भागातुन व तेही एका शेतकऱ्याच्या मुलाशी भेटून नक्कीच आनंद झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने मला देखील अभिमान वाटल्याचे योगेश भामरे यांनी सकाळशी बोलतांना व्यक्त केले.

पिंगळवाडे येथील शेतकरी विश्वास भामरे यांचा मुलगा योगेश भामरे हा बीई नंतर स्वीडनमध्ये जागतिक पातळीवरील मानांकित अश्या रॉयल जनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजि मध्ये एमएस व पीएचडी चे शिक्षण घेत आहे.

नुकत्याच स्वीडनची राजधानी स्टोकहोम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय "मेक इन इंडिया" कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सुभाष देसाई,केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.एका शेतकऱ्याच्या मुलाने एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात देश्याच्या व राज्याच्या प्रमुख  नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे योगेशने सांगितले.

मुख्यमंत्री सोबत त्याने चहा पाना दरम्यान विविध रेसिलिएन्ट प्लांनिंग, डीसास्टर मॅनेजमेंट, सोल्युशन्स फॉर वेस्ट म्यानेगमेंट, वेस्ट टू एनेरजि ,स्कोप अँड नीड ऑफ महाराष्ट्र, सिस्टयान्बिलीटी डेव्हलपमेन्ट, आणि त्याच्या ह्या विविध नवीन संकल्पनांचा विषयी चर्चा केली. योगेश सध्या काय करतोय, गावाकडची देखील चौकशी मुख्यमंत्र्यांनी या भेटीत केल्याचा योगेशला अधिक अभिमान वाटला.योगेशचे सर्वानीच कौतुक केले.

योगेशनेही या आधी स्थानिक आमदारांना देखील भेटला नसताना जागतिक पातळीवरील परिषदेत थेट मुख्यमंत्र्याशी भेट घेत चहापान केला.आणि दिलखुलास गप्पा मारल्या.याचबरोबर कार्यक्रमात त्याने भारत फॉर्गे ग्रुपचे बाबा कल्याणी ,विजय पिंगळे  (आयएएस)विजय सावंत (Iइंडियावे कंपनीचे सर्वेसर्वा) ,राजीव मोदी (कॅडीला फार्म चे प्रमुख) जितेंद्र शर्मा अश्या मोठं मोठ्या उद्योजकांशी त्याने भेट घेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मा.सुभाष देसाईंन सोबत त्याने त्याच्या स्वतःच्या स्टार्ट उप प्लॅन बद्दल चर्चा  केली .सुभाष देसाईंनी त्याला महाराष्ट्रात परत आल्यावर सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन ही दिले. मी माझ्या भागातील नवतरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी कधीही उपलब्ध आणि तत्पर असल्याचे त्यांनी सकाळ शि बोलतांना सांगितले.