गोळीबार, खूनप्रकरणी सहा दिवसांची कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

नाशिक - हप्ता न दिल्याच्या कारणातून कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या युवकावर गोळीबार करणाऱ्या चार आरोपींपैकी आज न्यायालयाने तिघांना सहा, तर एकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

नाशिक - हप्ता न दिल्याच्या कारणातून कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या युवकावर गोळीबार करणाऱ्या चार आरोपींपैकी आज न्यायालयाने तिघांना सहा, तर एकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

संदीप लाड या युवकावर संशयित शेखर निकम, केतन निकम, विशाल भालेराव व संदीप पगारे यांनी हप्ता न दिल्याने गोळी झाडून गंभीर जखमी केले. चौघेही फरारी होते. पोलिसांनी संशयित संदीप पगारे याला तत्काळ अटक केली. शेखर निकम, केतन निकम व विशाल भालेराव यांना औरंगाबाद येथील जगदंबा लॉजमधून शुक्रवारी रात्री अटक केली. या गुन्ह्यात वापरलेला कट्टा, चारचाकी गाडी, कट्टा कोणी व कधी आणि कोठून घेतला, या गुन्ह्यात इतर कोणी सहभागी आहे का, याबाबत तपास करायचा असल्याने सरकारी वकिलांनी पोलिस कोठडीची मागणी केली. शखेर निकम व विशाल भालेराव यांच्यावर पोलिस ठाण्यात प्रत्येकी आठ ते नऊ गुन्हे दाखल आहेत. शेखर निकम उपनगर येथील तरुणाच्या खूनप्रकरणात हवा आहे.