खेड: गावठी दारुचे रसायन पोलिसांकडून नष्ट

गोपाळ शिंदे
शनिवार, 15 जुलै 2017

गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करत अवैध व्यावसायिक आदिवासी गरीब नागरिकांना हाताशी धरून घनदाट जंगलाचा फायदा घेत आपला अवैधरित्या व्यवसाय तेजीत चालवत असे. मात्र घोटी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी या व्यवसाय धारकांच्या नांग्या गोपनीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समन्वय साधत अवैधरित्या धंद्यावर लगाम कसल्याने सळो की पळो केले आहे, याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

घोटी : घोटी पोलिसांच्या धडक कारवाईत खेड येथील देवाचीवाडी येथे अवैध गावठी दारूचे सोळाशे लिटर, ऐंशी हजार रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून अज्ञातांनी देवाची वाडी खेड परिसरात जोरदारपणे गावठी दारू बनवण्याचा कारखाना सुरू केल्याची माहिती समजताच पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी काही निवडक पोलीस कर्मचारी अधिकारी यांना सोबत घेत भर पावसात अवैधरित्या गावठी दारू अडयावर छापा घातला. यावेळी तब्बल सोळाशे लिटर गुळ मिश्रित विषारी रसायन नष्ट करण्यात आले. मात्र, पोलिस आल्याची माहिती मिळाली असता कामगार घटनास्थळावरून फरार झाले, यावेळी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करत अवैध व्यावसायिक आदिवासी गरीब नागरिकांना हाताशी धरून घनदाट जंगलाचा फायदा घेत आपला अवैधरित्या व्यवसाय तेजीत चालवत असे. मात्र घोटी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी या व्यवसाय धारकांच्या नांग्या गोपनीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समन्वय साधत अवैधरित्या धंद्यावर लगाम कसल्याने सळो की पळो केले आहे, याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कार्यवाही कायम सुरु ठेवण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची असुन कोणालाही तालुक्यात अवैधरित्या व्यवसाय आढळल्यास घोटी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी सकाळ प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना सांगितले. या धडक मोहिमेत उपनिरीक्षक नवगिरे, माळी, पोलीस नाईक संतोष दोंदे, शीतल गायकवाड,लहू सानप, सुहास गोसावी आदी कर्मचारी उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :