पक्षाची प्रतिमा सांभाळा, अन्यथा कडक कारवाई - गिरीश महाजन

पक्षाची प्रतिमा सांभाळा, अन्यथा कडक कारवाई - गिरीश महाजन

नाशिक - महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली, तरी पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद, विरोधकांची होत असलेली सरशी या विषयांवरून भाजपची बदनामी होत असताना बांधकाम विभागातील लाचखोरीत अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रकरणात भाजप नेत्यांचा संबंध येत असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. पक्षाची प्रतिमा सांभाळा, अन्यथा कारवाई करू, असा दम त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. 

पालकमंत्री महाजन यांनी आज महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली. प्रारंभी स्वीकृत नगरसेवकपदासाठी वरिष्ठ पातळीवर लॉबिंग होत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी झाडाझडती घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागातील लाच प्रकरणात अटक केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये महापौर रंजना भानसी यांच्या नातेवाइलाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पक्षाला अडकवू नये, असा सल्ला त्यांनी दिला. पक्षातील गटबाजीमुळे जनमानसात प्रतिमा मलिन होत असल्याची कबुली देताना पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी शेवटचा इशारा त्यांनी दिला. या वेळी महापौर भानसी यांच्यासह आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com