रोड रोमियोंच्या त्रासाला कंटाळून तरुणीची रेल्वेखाली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

शहरातील पचितराय परीसरात रेल्वेच्या रूळावर तरुणीच्या अनोळखी प्रेताने शहरात एकच खळबळ उडाली. दुपारी एकच्या दरम्यान महाराणा प्रताप चौकातील राखी संजय भगत (वय १९) या तरूणीने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली.

घोटी : रोड रोमियोंच्या त्रासाला कंटाळून तरुणीची धावत्या रेल्वे खाली आत्महत्या महाराणा प्रताप चौकात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहरातील पचितराय परीसरात रेल्वेच्या रूळावर तरुणीच्या अनोळखी प्रेताने शहरात एकच खळबळ उडाली. दुपारी एकच्या दरम्यान महाराणा प्रताप चौकातील राखी संजय भगत (वय १९) या तरूणीने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली. याबाबत स्टेशन मास्तर यादव यांनी घोटी पोलिस ठाण्यात कळवल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सदर तरुणीस गावातील काही रॉडरोमिय त्रास देत असल्याचे नातेवाईकांचे म्हणे आहे. याबाबत अनेकदा तरूणीने घरच्यांना माहिती दिली होती. यात सुधारणा होईल असे वाटत असतानाच तरुणीच्या आत्महत्याचे वृत्त कळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सविस्तर माहिती नातेवाईकांनी दिलेली नसून, पुढील घटनेचा तपास साहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश सांगळे,पोलीस नाईक भास्कर शेळके अधिक तपास करत आहे.

Web Title: Nashik news girl suicide in Ghoti