समृद्धीच्या कामाला गती द्या - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

नाशिक - समृद्धी महामार्गाच्या कामात पिछाडीवर पडलेल्या जिल्ह्यांतील शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून तत्काळ तोडगा काढत कामाची गती वाढविण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला.

समृद्धी मार्ग जात असलेल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. जमीन संपादनातील अडचणींचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., समृद्धी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे उपस्थित होते. जिल्ह्यात 40 शेतकऱ्यांची 30 हेक्‍टर जमीन संपादित असून, 33 कोटींचा मोबदला दिला गेला आहे. मोजणी बाकी असलेल्या गावांची मोजणी पूर्ण करून थेट खरेदी प्रक्रियेद्वारे जमिनीचे संपादन करा, विरोध होणाऱ्या गावांतून तेथील शेतकऱ्यांशी समन्वय साधून चर्चेतून तोडगा काढण्याचेही निर्देश दिले.