शहरात घाणीचे साम्राज्य, रोगराईला आमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नाशिक - सध्या शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य असून, रोगराईला आमंत्रण दिले जात आहे. ठिकठिकाणी पडून असलेला कचरा जमा करण्यासही कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. शालिमार, गंजमाळ, रविवार कारंजा, घनकर लेन, वकीलवाडी, पंचवटी आदी भागांमध्ये महापालिकेकडून स्वच्छता मोहीम राबविली जात नसल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचे ढीग तयार झाले आहेत. 

पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांबाहेरही कचरा साचत असून, तोही उचलला जात नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स