महामार्गांवरील मद्य विक्री दुकान परवान्यांचे नूतनीकरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुडणारा महसूल लक्षात घेत शहरांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य महामार्ग लगतची मद्य विक्री दुकानांचे परवाने नुतनीकरण करण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी यांनी आज काढले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य विरूद्ध के. बालू व इतर याचिकांमध्ये १५ डिसेंबर २०१६ व ३१ मार्च २०१७ रोजी दिलेल्या आदेशान्वये राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर व २० हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी २२० मीटर अंतरावरील मद्यविक्री दुकानांचे परवाने देणे व नुतनीकरण बंद केले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबरच्या मुळ आदेशाबाबत स्पष्टीकरण दिले असून यात शहर हद्दीतून जाणाऱ्या राज्य/राष्ट्रीय महामार्गवरील मद्यविक्री करणाऱ्या परवानाधारकांना लागू होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.