उत्कंठा अन्‌ निकालाने जल्लोष

उत्कंठा अन्‌ निकालाने जल्लोष

आयुष्याच्या वळणावरची बारावी. कुठं जायचं, काय करायचं त्याची निश्‍चिती. पाल्यापेक्षा आई-वडिलांची कसोटी असणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. ३०) दुपारी ऑनलाइन लागला. ज्याची उत्कंठा लागली होती तो निकाल पाहताच पाल्यांसह पालकांनी एकच जल्लोष केला. महाविद्यालयांनी आपल्या निकालाच्या यशाची परंपरा कायम ठेवली. विशेष म्हणजे, या निकालात दिव्यांगांनीही यशाला गवसणी घातली.

के. जे. मेहता हायस्कूलचा निकाल ८६.३६ टक्के 
नाशिक रोड ः साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. जे. मेहता हायस्कूल व ई. वाय. फडोळ कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ८६.३६ टक्के लागला, अशी माहिती प्राचार्या करुणा आव्हाड यांनी दिली. 

वाणिज्य शाखेचा निकाल ९६.३६ टक्के लागला. २६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९४.९३ टक्के लागला. १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ७१.६० टक्के लागला. १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किमान कौशल्य विभागाचा निकाल ८४.३७ टक्के लागला. ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थाध्यक्ष गणपत मुठाळ, सचिव प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे, प्राचार्या करुणा आव्हाड, उपप्राचार्या एस. के. निकम, एस. एस. शिंदे आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आरंभ महाविद्यालयाचा निकाल ९५ टक्के
आरंभ महाविद्यालयाचा निकाल ९५ टक्के लागल्याची माहिती प्राचार्य प्र. ल. ठोके यांनी दिली. कला शाखेचा निकाल ८४.२९ टक्के लागला. खुशबू सोनवणे ८३.३८ टक्के गुण मिळवून प्रथम, तर शिवानी जाधव ७९.८५ टक्के गुण मिळवून द्वितीय आली. वाणिज्य शाखेचा निकाल ९७.८८ टक्के लागला. नेहा सावंत ८८.६१ टक्के गुण मिळवून प्रथम, धनश्री गायधनी ८८.६१ टक्के गुण मिळवून द्वितीय आली. विज्ञान शाखेचा निकाल ९७.४५ टक्के लागला. चारुल पत्की ७७.६९ टक्के गुण मिळवून प्रथम, संजीवनी काळे द्वितीय आली. उच्च माध्यामिक व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांचा निकाल ९५.२३ टक्के लागला. अकाउंट व ऑडिटिंग विषयात कार्तिक नागरे ७८.४६ टक्के गुण मिळवून प्रथम आला. पर्चेसिंग ॲन्ड स्टोअर किपिंगमध्ये माधुरी जाधव ७७.२३ प्रथम, तर मार्केटिंगमध्ये सोनल ढगे ६६.६१ प्रथम आली. प्राचार्य प्र. ल. ठोके, उपप्राचार्य सुनील हिंगणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. संगीता पवार, गणेश खांबेकर, राजेंद्र शेळके, श्रीकृष्ण लोहकरे, प्रतिभा पंडित, कैलास निकम, संगीता मुसळे, केशव रायते, सुरेखा पवार, संदीप निकम, अपर्णा बोराळे, आनंद खरात, यशवंत सूर्यवंशी, भरत खंदारे, शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सुश्रुत ताजणे, श्रुती गायकवाड प्रथम
के. के. वाघ स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुरिया पार्क वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के, तर विज्ञान शाखेचा निकाल ९८.२७ टक्के लागला. सुश्रुत ताजणे (७४.६१ टक्के) विज्ञान शाखेतून, तर श्रुती गायकवाड (७४) वाणिज्य शाखेतून यशस्वी झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्‍वस्त सचिव के. एस. बंदी, समन्वयक भूषण कर्डिले, प्राचार्या चित्रा नरवडे आणि शिक्षकांनी अभिनंदन केले. 

भोसला मिलिटरी कॉलेजचा ८३.९० टक्के निकाल 
भोसला सैनिकी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८३.९० टक्के लागला. यात विज्ञान शाखेचा ९१.६२, कला ६१.८८, तर वाणिज्य शाखेचा ९४.९३ टक्के निकाल लागला. 

सुचेतसिंग वालिया प्रथम
गोदावरी शिक्षण मंडळ संचलित जी. डी. सावंत कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.४१ टक्के, वाणिज्य ८६, तर कला शाखेचा निकाल ६५ टक्के लागला. विज्ञान शाखेत सुचेतसिंग वालिया (९२.४६) याने प्रथम, तर आकांक्षा बिरारी (९०.१५) हिने द्वितीय, तर ऋतुजा इंगळे (८९.५३) हिने तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत शुभांगी अंबडकर (८२.३०) हिने प्रथम, रोशन खैरनार (८०.३०) द्वितीय, तर विद्या ढोबळे (७९) हिने तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत अर्चना कोकाटे (६७.८४) हिने प्रथम, श्‍याम कापसे (६४) याने द्वितीय, प्रियंका जाधव (६२.३०) हिने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बी. बी. चौरे, अशोक सावंत, प्राचार्य डॉ. एन. आर. कापडणीस यांनी अभिनंदन केले.

शिवानी कोठावदे प्रथम
डॉ. एम. एस. गोसावी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्सचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ८९.६६ टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेत शिवानी कोठावदे (८६) हिने प्रथम, सिद्धी मराठे (८५.०८) हिने द्वितीय; तर पूजा जैन (८२.१५) तृतीय आली. वाणिज्य शाखेत पूर्वी कुचिरिया ही ८७.८५ टक्के गुण मिळवून प्रथम, तर नम्रता सिंग (८३.०८) द्वितीय, अद्वैत खरे (८०.७७) तृतीय आली. 

अमर क्षीरसागर प्रथम
सपकाळ नॉलेज हबचा १०० टक्के निकाल लागला असून, अमर क्षीरसागर (८३.५४) याने प्रथम क्रमांक मिळविला. बीवायके महाविद्यालयाचा ९६ टक्के निकाल लागला. वाय. डी. बिटको ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९७ टक्के लागला असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्रशासन विभागाकडून देणयात आली.

मुस्कान रफिक शेख प्रथम
महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेच्या पखाल रोडवरील गुरुवर्य मोतीराम सोंडाजी शिंदे वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९५.८९ टक्के लागला. या महाविद्यालयातून ७३ पैकी ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुस्कान रफिक शेख (७२.९२) हिने प्रथम, तनुजा सुरेश देशमुख (७१.८५) हिने द्वितीय, तर वैष्णवी निरंजन कमोद (६७.६९) हिने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुभाष सोनवणे, सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर, कार्याध्यक्ष भाऊराव बच्छाव, खजिनदार दिनेश बच्छाव, शालेय समितीचे अध्यक्ष प्रा. एन. जे. पाटील, संचालक वसंत अहिरे, प्राचार्य मधुकर बच्छाव, रोहिणी जगताप, मीनल अकोले, ज्योती मोरे, श्री. गांगुर्डे यांनी अभिनंदन केले.

एसव्हीकेटी महाविद्यालयाचे यश 
देवळाली कॅम्प ः मविप्रच्या येथील विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा ९८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.४८, तर कला शाखेचा ५३.६७ टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेत उदय मुसळे (७७.८४), आकाश पानसरे (७७.८४), सौरभ टोचे (७६.९२) अनुक्रमे प्रथम ते तृतीय आले. वाणिज्य शाखेत राधिका पोरजे (८६.६२), भाग्यश्री धनराजनी (८३. ८५), मैनाबाई काळे (७९.५४) आणि कला शाखेत वृषाली मोजाड (७१.३८), नीलम पाळंदे (७०.६२), अश्‍विनी पोरजे (६९.६९) यांनी यश मिळविले. वाणिज्य विभागात प्रथम श्रेणीत २२६ पैकी १२१, विशेष प्रावीण्यात २८, द्वितीय श्रेणीत ५४ आणि तृतीय श्रेणीत सहा विद्यार्थी यशस्वी झाले. कला शाखेत विशेष प्रावीण्य मिळविलेले २२ विद्यार्थी असून, प्रथम श्रेणीत ६०, द्वितीय श्रेणीत १३ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. प्राचार्य डॉ. विजय मेधणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com