भाजपचे खासदार विकास महात्मे यांच्या पुतळ्याचे दहन

विजय पगारे
रविवार, 25 जून 2017

माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर गुन्हे दाखल करा असे वक्तव्य केल्याप्रकरणी सिन्नर शिर्डी महामार्गावर धनगर समाजाचे महात्मे यांच्या पुतळ्याचे दहन

इगतपुरी : धनगर समाजातील घटकांच्या आरक्षण बाबत झालेल्या बाचाबाचीत भाजपचे खासदार विकास महात्मे  यांनी माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर गुन्हे दाखल करा असे वक्तव्य केल्याप्रकरणी आज इगतपुरी तालुक्यातील संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन सिन्नर शिर्डी महामार्गावर धनगर समाजाचे महात्मे यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला.  

सद्यस्थितीत धनगर समाजाचा आदिवासी जमातीत समावेश करू नये हे आरक्षण आदिवासी समाजातील वंचित घटकांच्या डोळ्यात धूळ फेकणारे असून,टाटा कंपनीचा सर्वे बनवा बनविचा खेळ आहे,भाजप सरकार टाटा कंपनीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची दिशाभूल करीत आहे.         

यासाठी विरोध करणाऱ्यास  सरसावलेल्या आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर गुन्हे दाखल करा असे वक्तव्य केल्याप्रकरणी धनगरांचे विकास महात्मे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होण्यासाठी समस्त आदिवासी बांधव एकवटले होते.पिंपळगाव मोर येथे संतप्त जमावाने निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी देऊन खासदार  महात्मे  यांच्या पुतळ्याची होळी करण्यात आली महात्मे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून लवकरच त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी  मागणीही याप्रसंगी  आदिवासी बांधवांनी केली.
यावेळी कार्याध्यक्ष राजू गांगड, तालुकाध्यक्ष विनायक भले,विक्रम राजे भांगे,संपर्क प्रमुख आकाश भले,अशोक जाखेरे, प्रकाश गोडे,शांताराम भांगे , रवींद्र पारधी,नागनाथ पिचड,गणेश गोंदके,योगेश बांबळें,नंदू जाधव,निलेश गभाले,भाऊराव भांगरे आदी उपस्थित होते.