माजी मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा प्रभारीपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यापूर्वी नाशिकचे प्रभारीपद माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होते. आव्हाड यांना नाशिकच्या संघटनात्मक पातळीवर लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून पाटील यांच्याकडे प्रभारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून देण्यात आली. जयंत पाटील आज (ता.

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा प्रभारीपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यापूर्वी नाशिकचे प्रभारीपद माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होते. आव्हाड यांना नाशिकच्या संघटनात्मक पातळीवर लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून पाटील यांच्याकडे प्रभारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून देण्यात आली. जयंत पाटील आज (ता. २४) दुपारी चारला राष्ट्रवादी भवनमध्ये शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकांऱ्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती रंजन ठाकरे यांनी दिली.

Web Title: nashik news jayant patil NCP