कल्याण-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्पच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नाशिक - पावसासोबतच लोहमार्गावरील अपघातामुळे विस्कळित झालेला मार्ग दुरुस्त करण्याचे प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ते आज दिवसभरात पूर्ण झाले नाही. त्यामुळे कल्याण ते भुसावळदरम्यान आज दुतर्फा धावणाऱ्या 27 रेल्वेगाड्या धावल्याच नाहीत. दिवसभर जिल्ह्यातील सगळ्या स्थानकांवर शुकशुकाट होता. आसनगावला दुरांतो एक्‍स्प्रेसच्या अपघातामुळे विस्कळित झालेली रेल्वेसेवा अद्यापही सावरू शकलेली नाही. संततधारेमुळे कामास अडसर येत असून, अवजड यांत्रिक उपकरण लावूनही दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे.