क्रांतिदिनी स्वातंत्र्यसैनिकांचे लाक्षणिक उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नाशिक - बेघर स्वातंत्र्यसैनिकांना घर आणि एकसमान निवृत्तिवेतनाच्या मागणीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी आज क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. नाशिक शहर-जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समितीच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकात ध्वजवंदनानंतर हे आंदोलन झाले.

संस्थेचे अध्यक्ष पंडित येलमामे, सरचिटणीस वसंतराव हुदलीकर यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. निवेदनात उतारवयात स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या न्याय-हक्कांसाठी केंद्र शासनाकडे संघर्ष करावा लागत आहे. वृद्धापकाळातील स्वातंत्र्यसैनिकांच्या मागण्या सरकारकडून पूर्ण होत नाहीत. हिंदूमाता स्वातंत्र्यसैनिक सोसायटीला तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांनी जागावाटप करूनही स्वातंत्र्यसैनिकांना जागा दिलेली नाही. बेघर स्वातंत्र्यसैनिकांना घरकुल मिळायला हवे, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीत १० टक्के आरक्षण मिळावे. भूमिहीन स्वातंत्र्यसैनिकांना जमीन मिळायला हवी आणि कुटुंबातील सदस्यांना लष्कर आणि पोलिस भरतीत प्राधान्य मिळायला हवे आदी मागण्या करण्यात आल्या. दगडूसा कलाल, मनोहर कुलकर्णी, सरस्वती मोरे, विमलबाई आटवणे, सरस्वती पाटील, सत्यभामा मोजाड, जिजाबाई शिंदे, लक्ष्मीबाई गायकवाड आदी उपस्थित होते.