नॅक मानांकनात केटीएचएम अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नाशिक - नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडिएशन कौन्सिलच्या (नॅक) मानांकनामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाने राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे.

नाशिक - नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडिएशन कौन्सिलच्या (नॅक) मानांकनामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाने राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे.

महाविद्यालयाने 3.79 (सीजीपीए) इतके सर्वाधिक गुण मिळविले असून, अ++ दर्जा प्राप्त केला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेले महाविद्यालय अशी देखील या महाविद्यालयाची ओळख आहे. वेगवेगळ्या सात निकषांच्या आधारे "नॅक' या बंगळूर स्थित मानांकन संस्थेने 22, 23 सप्टेंबरला "सेल्फ स्टडी रिपोर्ट'च्या आधारे त्रिस्तरीय समितीद्वारे मूल्यांकन केले. नॅक समितीसमोर महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती व महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती सादर करण्यात आली.