बिबट्या आला, कुणी नाही पाहिला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

‘मेरी’ परिसरात पाहिल्याचा दावा, वन विभागाची शोधमोहीम; परिसरात शुकशुकाट

पंचवटी - दिंडोरी रोडवरील ‘मेरी’च्या आवारात रविवारी (ता. २०) एका स्कार्पिओ चालकाने बिबट्या पाहिल्याचा दावा केला. वाहतूक शाखेच्या पोलिसाला सांगितल्यानंतर वन खात्यासह पोलिसांनी जंगजंग पछाडूनही बिबट्या न सापडल्याने ‘बिबट्या आला, कुणी नाही पाहिला’ असे म्हणण्याची वेळ आली. बिबट्याच्या भीतीने सायंकाळनंतर या भागात शुकशुकाट जाणवला. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या भागातील सीडीओ-मेरी शाळा प्रशासनाने उद्या (ता. २१) सुटी जाहीर केली आहे.

दिंडोरी रस्त्यावरून पाचच्या सुमारास स्कॉर्पिओचालकाने बिबट्या रस्ता ओलांडून गेल्याचे येथील ड्यूटीवरील हवालदारास सांगितले. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून बिबट्याचा शासकीय पातळीवर सर्वत्र शोध सुरू झाला. यादरम्यान बघ्यांची गर्दीही वाढू लागली. काही वेळाने पोलिसांसह वन खात्याचे अधिकारी व कर्मचारीही दाखल झाले. त्यांनी सर्वत्र बिबट्याचा शोध घेतला. मात्र बिबट्याच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे त्यांना आढळून आले नाहीत. दुपारनंतरच मेरी भागात बिबट्या आल्याची माहिती व्हॉट्‌सॲपद्वारे व्हायरल झाल्याने परिसरात राहणाऱ्यांकडे नातेवाइकांचे फोन खणाणू लागले. नगरसेवक अरुण पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले. या न दिसलेल्या बिबट्याची दहशत रात्रीपर्यंत कायम होती.

सीडीओ-मेरीला आज सुटी 
बिबट्याची दहशत या भागातील नागरिकांनी घेतली असून, सायंकाळनंतर परिसरात शुकशुकाट होता. अनेक ठिकाणी बिबट्याचीच चर्चा सुरू होती. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सीडीओ-मेरी शाळेच्या स्कूल कमिटीच्या अध्यक्षांनी उद्या (ता. २१) सुटी जाहीर केली. 

या भागात बिबट्या आल्याचे केवळ एका व्यक्तीने पाहिले. पोलिसांसह या भागात बराच वेळ फिरलो; परंतु बिबट्याचे अस्तित्व जाणवले नाही. पिंजरा लावण्यासाठी काही पद्धती असल्याने बिबट्या असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो लावता येणार नाही.
- राजेंद्र ठाकरे, वनरक्षक

Web Title: nashik news leopard