बालकांसाठी खेडोपाडी हवी अत्याधुनिक उपचारपद्धती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

इंदिरानगर - अतिदक्षतेची आवश्‍यकता असलेल्या बालकांची व नवजात शिशूंची संख्या शहरापेक्षा खेड्यांत जास्त असते. त्यामुळे या बालकांना आवश्‍यक असणारी अत्याधुनिक उपचारपद्धती तिथे पोचणे गरजेचे असून, त्यासाठी त्या- त्या ठिकाणच्या बालरोगतज्ज्ञांना या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण द्यायला हवे, असे मत बेंगळुरू येथील रमय्या वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या बालकांच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. करुणाकरन यांनी व्यक्त केले. 

इंडियन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्‍सच्या अतिदक्षता शाखेतर्फे झालेल्या "महापेडिक्रिटिकॉन' या तिसऱ्या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्‌घाटनाप्रसंगी बोलत होते. या शाखेचे राज्य अध्यक्ष डॉ. बकुल पारख, सचिव डॉ. संजय घोरपडे, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. संजय मालवतकर, ऍकॅडमीच्या नाशिक जिल्हाध्यक्षा डॉ. संगीता बाफणा- लोढा, सचिव डॉ. अमित पाटील, डॉ. रमाकांत पाटील आदी उपस्थित होते. 

डॉ. करुणाकरन म्हणाले, की या कार्यशाळेत थेट प्रात्यक्षिकांद्वारे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग संबधितांनी करून घेतला पाहिजे. बालमृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी सर्वदूर असलेल्या घटकापर्यंत अत्याधुनिक ज्ञान असलेला बालरोगतज्ज्ञ पोचला पाहीजे. या वेळी स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. 

दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात देशाच्या विविध भागांतून डॉ. सुचित्रा रणजित, डॉ. मधुमती ओटीव, डॉ. शिरीन गुप्ता, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. संजय घोरपडे, डॉ. सुचित्रा रणजित, डॉ. परमानंद अंदणकर, डॉ. आशुतोष सिंग, डॉ. विनायक पत्की, डॉ. उमा अली, डॉ. धीरेन गुप्ता, डॉ. महिंदर धारीवाल, डॉ. सचिन शहा, डॉ. मनिंदर, डॉ. संतोष सोनस, डॉ. आनंद भुतडा, डॉ. सोनू उडाणी, डॉ. महेश मोहिते, डॉ. सागर लाड, डॉ. मंदार देशपांडे, डॉ. पंकज देशपांडे, डॉ. दयानंद नकाटे, डॉ. अभिजित बगदे, डॉ. दारीऊस मिर्झा, डॉ. धन्या धर्मपालन, डॉ. तनू सिंघल, डॉ. सचिन शहा आणि डॉ. सतीश देवपुजारी यांनी रुग्णालयाची तयारी, स्वाइन फ्लूग्रस्त बालकांचे उपचार, मशिनद्वारे केली जाणारी उपचारपद्धती, अपघातात मेंदूला इजा झालेल्या बालकांवरील उपचार आदी विषयांवर मार्गदर्शन केले. 

परिषदेसाठी पाचशे बालरोगतज्ज्ञ उपस्थित आहेत. संयोजन समितीचे डॉ. श्‍याम चौधरी, डॉ. हृषीकेश कुटे, डॉ. संजय आहेर, डॉ. तरुण कानडे, डॉ. अमोल मुरकुटे, डॉ. मिलिंद गांगुर्डे, डॉ. सुशील पारख, डॉ. सचिन चौधरी, डॉ. मिलिंद भारिया, डॉ. बाबूलाल अग्रवाल, डॉ. वैभव पुस्तके, डॉ. सुहान पाटील आदी संयोजन करत आहेत.