कष्टाच्या पैशांसाठी पावसात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

नाशिक - "कष्टाचा पैसा, मैत्रेयचा पैसा परत मिळालाच पाहिजे', "असा कसा देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही'... अशा भरपावसात घोषणा देत "मैत्रेय'चे ठेवीदार व गुंतवणूक प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. 

नाशिक - "कष्टाचा पैसा, मैत्रेयचा पैसा परत मिळालाच पाहिजे', "असा कसा देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही'... अशा भरपावसात घोषणा देत "मैत्रेय'चे ठेवीदार व गुंतवणूक प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. 

गेल्या दोन वर्षांपासून मैत्रेयचे ठेवीदार आपल्या हक्काचा पैसा परत मिळावा म्हणून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, कोणी दाद देत नाही. ठेवीदार शेवटी गुंतवणूकदार प्रतिनिधींना धारेवर धरत असल्याने त्यांचे जगणे असह्य झाले आहे. या ज्वलंत प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज मैत्रेयचे ठेवीदार व प्रतिनिधींतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावार मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी एक- दीड हजार महिलांनी प्रशासनाविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मैत्रैय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील, उपाध्यक्ष प्रदीप शिसोदे, सचिव नीलेश वाणी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

"मैत्रेय'कडून 2014 पासून मुद्दल व व्याजही मिळत नसल्याने गुंतणूकदार अडचणीत आले आहेत. आतापर्यंत अल्पसा परतावा वगळता काहीही पदरात पडले नाही. शासकीय यंत्रणा या प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांच्याविरुद्धही त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात सहभागी होत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी गुंतवणूकदारांना पाठिंबा दिला. 

"मैत्रेय'चा कारभार 
कंपनीची एकूण कार्यालये : 126 
प्रतिनिधी संख्या : 8 लाख 
गुंतवणूकदार : 28 लाख 
अडकलेली रक्कम : 2 हजार 800 कोटी 

उत्तर महाराष्ट्र

पंचवटी - आम्ही पोलिस असून, तुमच्या घरात राहात असलेल्या मुली वेश्‍याव्यवसाय करतात, असे समजल्यावरून कारवाई करण्यासाठी आलो आहोत....

02.00 PM

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू व डेंगीचा विळखा पडला असताना त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी महापालिकेत बहुमत असलेल्या सत्ताधारी...

02.00 PM

पंचवटी - त्र्यंबकेश्‍वर परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली. खबरदारीचा उपाय म्हणून...

02.00 PM