नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोठावदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मा. श्री भास्करराव कृष्णाजी कोठावदे यांची तर उपाध्यक्षपदी काशिनाथ कृष्णा चव्हाण निवड झाली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मा. श्री भास्करराव कृष्णाजी कोठावदे यांची तर उपाध्यक्षपदी काशिनाथ कृष्णा चव्हाण निवड झाली आहे.

फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी नारायण केरुजी वाजे व जनसंपर्क संचालकापदी सौ. अश्विनीताई अशोक बोरस्ते यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्नील जगताप यांनी कामकाज पाहिले. सोबत तालुका उपनिबंधक श्री संजय गीते व नवनिर्वाचित संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.