बारा दुकानांमध्ये आज २४ तास औषधपुरवठा

बारा दुकानांमध्ये आज २४ तास औषधपुरवठा

सातपूर - केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट संघटनेच्या उद्या (ता. ३०)च्या राज्यव्यापी संपावेळी आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी अन्न व औषध विभागातर्फे शहर आणि जिल्ह्यातील १२ औषध दुकानांमध्ये २४ तास औषध पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी उद्योगभवनात स्वतंत्र समन्वय कक्षही स्थापन करण्यात आल्याचे अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त व्ही. टी. जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

औषध व अन्न प्रशासनाच्या नाशिक विभागाचे सहआयुक्त यांनी रुग्णांचे कोणत्याही परिस्थितीत हाल होऊ नये म्हणून शहरातील व जिल्ह्यातील १२ औषध दुकाने २४ तास उघडे राहणार असून, त्याद्वारे अत्यावश्‍यक औषधे पुरविली जातील. तसेच, खासगी रुग्णालयांनाही पुरेसा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी अन्न व औषध विभागाच्या उद्योग भवनातील कार्यालयात स्वतंत्र समन्वयक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यात सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांच्याशी (भ्रमणध्वनी ः ९८२०२३२९४५) आणि (दूरध्वनी ः ०२५३ २३५१२०१) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

केमिस्ट असोसिएशनचा  आज देशव्यापी संप 
केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्टच्या अखिल भारतीय संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी उद्या (ता. ३०) देशव्यापी संप केला जात असून, जिल्ह्यातील सर्व केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट दुकाने बंद करण्याचे आवाहन जिल्हा संघटनेने केले आहे. केंद्र सरकारतर्फे ऑनलाइन केंद्र, ई- पोर्टल योजनेतील तांत्रिक अडचणी, तसेच ऑनलाइन औषध विक्री प्रक्रियेला प्रमुख विरोध करीत केमिस्ट संघटनेच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेपाच हजार, तर महाष्ट्रातील ५५ हजार केमिस्ट बांधव संपात सहभागी होणार असल्याचे नाशिक जिल्हा केमिस्ट अँडहॉक कमिटीचे सदस्य हेमंत पाठक, मयूर अलई, विजय तिवारी, प्रमोद रानडे, संदीप शहा यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. बंदमध्ये नाशिक केमिस्ट असोसिएशन सहभागी असून, हा बंद १०० टक्के यशस्वी करावा, असे आवाहन  असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र धामणे, सरचिटणीस प्रशांत पवार यांनी निवेदनाद्वारे केले. केमिस्ट व्यवसायात केंद्र व राज्य सरकार ऑनलाइन विक्रीची योजना आणून औषध विक्री करणाऱ्यांवर विविध स्वरूपाचे निर्बंध आणू पाहत असून, यामुळे केमिस्ट व्यवसाय धोक्‍यात येणार असल्याचा दावा कमिटीचे सदस्य मयूर अलई यांनी केला आहे.

येथे २४ तास औषधे
प्रयास मेडिकल स्टोअर, प्रयास हॉस्पिटल, मालेगाव 
झैनम मेडिकल, इस्लामपुरा, मालेगाव 
द्वारकामणी मेडिकोज-हॉस्पिटल, मालेगाव
सोहम मेडिकल व संकल्प हॉस्पिटल, सटाणा 
इंटलेक्‍स वेलनेस केमिस्ट, चंद्रकिरण पार्क, गोविंदनगर, नाशिक 
वेलनेस फॉर एव्हर लाइफस्टाइल केमिस्ट, तळ मजला,  विश्‍व अपार्टमेंट,  अशोक स्तंभ, नाशिक 
वेलनेस फॉर एव्हर लाइफस्टाइल केमिस्ट, ईश्‍वर संकुल, गायकवाड मळा, नाशिक रोड 
वेलनेस फॉरएव्हर लाइफस्टाइल केमिस्ट,  पाटील मळा, पाटील लेन ३, कॉलेज रोड 
वेदांत मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स, सुजाता बिर्ला हॉस्पिटल, नाशिक रोड 
वोक्‍हार्ट हॉस्पिटल मेडिकल स्टोअर, मुंबई-आग्रा रोड, वडाळा नाक्‍याजवळ  
जयराम हॉस्पिटल, मुक्तिधाम, नाशिक रोड 
अपोलो फार्मसी, अपोलो हॉस्पिटल,  आडगाव नाका, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com