‘मिस टिन युनिव्हर्स इंडिया’त नाशिकच्या श्रिया तोरणेची जादू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नाशिक - दिल्लीतील दी उमरावमध्ये झालेल्या ‘अब्राक्‍सस गॉडेस ऑफ ब्यूटी- २०१७’ या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत नाशिकच्या श्रिया तोरणे हिने ‘मिस टिन युनिव्हर्स इंडिया-२०१७’ या स्पर्धेत विजतेपद पटकावले. भैरवी बुरडने ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. श्रिया आणि भैरवी आता आंतररष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

श्रिया स्वप्नील तोरणे हिने विजेतेपद पटकावण्यासोबतच ‘मिस ब्यूटिफुल आइज’ हा किताब आपल्या नावे केला. फेब्रुवारी २०१८ मध्ये मध्य अमेरिकेत होणाऱ्या मिस टिन युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रिया भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भैरवी प्रदीप बुरड हिने या स्पर्धेत ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल’ हे विजेतेपद आणि बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजुनिअलिटी हा किताब पटकावला. जमैका येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल या स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करेल.  राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रिया आणि भैरवी यांची निवड पश्‍चिम भारत या विभागातून झाली होती.