48 तासांत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्‍यता

विनोद बेदकर
सोमवार, 12 जून 2017

मध्य महाराष्ट्रात आगामी पुढील 48 तासात हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.

नाशिक : राज्यात खरीप पेरण्यांना सुरवात झाली असतांना, मॉन्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावून शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा येत्या 48 तास मध्य महाराष्ट्रात जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात आगामी पुढील 48 तासात हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रासह पुणे विभागातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. पुणे जिल्ह्यात काही भागांमध्ये एव्हाना पावसाने हजेरी लावली आहे.