पंचवीस हजारांहून अधिक डास उत्पत्तीची स्थळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

नाशिक - पावसाळ्यात साथीच्या आजारांबरोबरच डासांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी डासांची उत्पत्तिस्थळे शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्वेक्षण मोहिमेतून शहरात पंचवीस हजारांहून अधिक डास उत्पत्तीची स्थाने आढळली आहेत. जबाबदार व्यक्तींना ती स्थळे नष्ट करण्याच्या नोटिसादेखील पाठविल्या आहेत. नोटिशीनंतरही कारवाई न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा पवित्रा आरोग्य विभागाने घेतला आहे.

महापालिकेतर्फे पावसाळा संपल्यानंतर डास उत्पत्तीची स्थाने शोधली जातात. परंतु यंदा डास उत्पत्ती स्थानाविषयी जनजागृती होण्यासाठी उन्हाळ्यामध्येच उत्पत्तिस्थळे शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. तीन वर्षांपासून पावसाळा संपत असताना डास उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने उन्हाळ्यातच सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. त्यात २५ हजार १३२ डास उत्पत्तिस्थळे शोधण्यात आली. डास उत्पत्ती होऊ नये म्हणून नियमित सफाईबरोबरच जनजागृती मोहीम व पेस्ट कंट्रोलच्या माध्यमातून औषधफवारणी केली जात आहे.

टॅग्स

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते....

01.27 AM

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017