विक्रीकर निरीक्षकाची ७ जानेवारीला,  राज्य सेवा पूर्व परीक्षा ८ एप्रिलला

विक्रीकर निरीक्षकाची ७ जानेवारीला,  राज्य सेवा पूर्व परीक्षा ८ एप्रिलला

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुढील वर्षी (२०१८) घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षा अशा ः राज्य कर (विक्रीकर) निरीक्षका (परीक्षेसाठी मागणीपत्र प्राप्त १९ एप्रिल)साठीची पूर्व परीक्षा- १६ जुलै २०१७ ला घेण्यात आली होती. आता मुख्य परीक्षा ७ जानेवारी २०१८ ला होईल. राज्य सेवा परीक्षा २०१८ ची पूर्व परीक्षा ८ एप्रिल २०१८ ला, तर मुख्य परीक्षा १८ ते २० ऑगस्ट २०१८ ला होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेची पूर्व परीक्षा ६ मे २०१८ ला होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१८ अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक १ हा २६ ऑगस्ट २०१८ ला, पेपर २ (पोलिस उपनिरीक्षक) हा २ सप्टेंबर २०१८ ला, राज्य कर निरीक्षकचा पेपर दोन ३० सप्टेंबर २०१८ ला, सहाय्यक कक्ष अधिकारीचा पेपर दोन ६ ऑक्‍टोबर २०१८ ला होणार आहे. महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षा १३ मे २०१८ ला, तर तर मुख्य परीक्षा ८ सप्टेंबर २०१८ ला होईल. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेची पूर्व परीक्षा २० मे २०१८ ला अन्‌ मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०१८ ला होईल. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेची पूर्व परीक्षा १० जून २०१८ ला आणि महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षाचा संयुक्त पेपर १ हा १४ ऑक्‍टोबर २०१८ ला, संयुक्त पेपर २ (लिपिक आणि टंकलेखक) हा २१ ऑक्‍टोबर २०१८ ला, संयुक्त पेपर २ (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क) हा ४ नोव्हेंबर २०१८ ला, संयुक्त पेपर २ (कर सहाय्यक) २ डिसेंबर २०१८ ला होईल. महाराष्ट्र वनसेवा परीक्षेची पूर्वपरीक्षा रविवार २४ जून २०१८ ला आणि मुख्य परीक्षा २८ ऑक्‍टोबर २०१८ ला घेण्यात येईल. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेची संयुक्त पूर्व परीक्षा ८ जुलै २०१८ ला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १७ नोव्हेंबर २०१८ ला होईल. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१८ ला होणार आहे. 

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २५ नोव्हेंबर २०१८ ला होईल. महाराष्ट्र विद्युत-यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १५ डिसेंबर २०१८ ला घेण्यात येईल. याशिवाय महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ४ ऑगस्ट २०१८ ला, सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २५ ऑगस्ट २०१८ ला घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com