बाप्पासाठीची नियमावली पालनाचा ‘श्रीगणेशा’ यंदा होणार?

विक्रांत मते
रविवार, 13 ऑगस्ट 2017

अधिकाऱ्यांची अंमलबजावणीत उदासीनता, स्मार्ट शहराबरोबरच सर्वांनीच आपलेपणाच्या भावनेतून करावा विचार

नाशिक - सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना रस्त्यांवर मंडप टाकण्यासाठी शासनाने नियमावली घालून दिली. महासभेने मंडप धोरण आखून दोन वर्षे झाली. पण या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. महापालिकेकडे अशा घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा, अधिकार आहे. मात्र, योग्य अंमबजावणीत उदासीनता दिसते. शिवाय नगरसेवकांमुळेही मर्यादा आहेत. 

महापालिकेने याकडे लक्ष ठेवण्याबरोबरच शहराप्रति आपलेपणाच्या भावनेतून काम व्हावे. त्यातूनच नियमांचे पालन होईल, तसेच तणावही टाळण्यास मदत होईल असे वाटते. येत्या पंचवीस ऑगस्टपासून पारंपरिक गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला, की नियम आलेच. चौकटीतील नियमांसाठी महापालिकेने राज्य शासनाच्या सूचनेनुसार मंडप उभारणीसाठी आचारसंहिता तयार केली आहे. सण, उत्सव, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करताना रस्त्यावर मंडप कसे टाकायचे, याबाबतच्या सूचना त्यात आहेत. रस्त्यावर खड्डे खोदल्यास पन्नास हजारांपासून दंड आकारणी होईल. विजेचे खांब, डीपी, पोलिसांची परवानगी अशा महत्त्वाच्या कायदेशीर सोपस्काराबरोबरच पोलिस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंडप नियमात टाकला आहे की नाही, याची पाहणी करून ‘ना हरकत’ दाखला घेणे बंधनकारक आहे. स्मार्ट बनण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. यंदापासून आचारसंहितेचा श्रीगणेशा होणे गरजेचे आहे.

मंडप धोरण कोणासाठी?
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, बकरी ईद, रमजान ईद, मोहरम, नाताळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती आदी महापुरुषांच्या जयंत्या, सार्वजनिक सण-उत्सवांसाठी टाकले जाणारे मंडप, लंगर, साई भंडारा, महाप्रसाद या कार्यक्रमांसाठी सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर, रस्त्याला लागून असलेल्या जागेत मंडप टाकणाऱ्यांसाठी आचारसंहिता महापालिकेने तयार केली आहे. 

आचारसंहितेने प्रभावित होणारी मंडळे
शहरात नवरात्रोत्सव मुख्यतः बंदिस्त सभागृह किंवा मोकळ्या मैदानावर होतात. त्याव्यतिरिक्त गणेशोत्सव, शिवजयंती, मोहरम रस्त्यांवर होतात. पान ४ वर 

रस्ता खोदल्यास दंड
मंडप बांधण्यापूर्वी वाहतूक पोलिस शाखा, स्थानिक पोलिस, अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला महापालिकेकडे दाखल करणे बंधनकारक आहे. फुटपाथवर मंडप बांधण्यास मनाई आहे. वीजतारा व डीपीपासून सहा फुटांवर मंडप बांधणे आवश्‍यक राहणार आहे. मंडप उभारताना रस्त्यावर खड्डा खोदता येणार नाही. त्याऐवजी वाळू भरलेल्या ड्रमवर मंडप उभारणी करण्यास परवानगी आहे. विनापरवानगी खड्डा खोदल्यास संबंधित मंडळाला पन्नास हजार रुपये चौरसफूट असा दंड आहे. खड्डे खोदण्यासाठी त्यासाठी हमीपत्र भरून घेतले जाणार आहे.