बेशिस्त हवालदारावर पोलिस अधीक्षकांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

नाशिक - ग्रामीण पोलिस दलामध्ये कर्मचाऱ्यांचे कोणतेही बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याची ताकीद नवनियुक्त पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली. सरकारी कामात अडथळा आणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यास मारहाण
केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचाऱ्याला थेट निलंबित केले.

12 जून 2017 ला वणी वन विभागाच्या विश्रामगृहामध्ये पिंपळगाव पोलिस ठाण्यातील हवालदार सुजित धुळाजी जाधव यांना रूम दिला नाही, म्हणून राग आल्याने त्यांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी तेथील चौकीदार यशवंत किसन हाडस यांना शिवीगाळ
करत बेदम मारहाण केली. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात हाडस यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. हे वर्तन पोलिस दलास अशोभनीय असल्याच्या कारणावरून पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी हवालदार जाधव यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली.