अतिक्रमित १२ मंदिरांना महापालिकेच्या नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

सातपूर - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सातपूर परिसरातील अतिक्रमित १२ मंदिरांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यात अनधिकृत मंदिरे काढून घेण्याची सूचना केली आहे. 

सातपूर - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सातपूर परिसरातील अतिक्रमित १२ मंदिरांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यात अनधिकृत मंदिरे काढून घेण्याची सूचना केली आहे. 

उच्च न्यायालयाने शहरातील विविध मुख्य स्त्यालगत असलेली मंदिरे त्वरित काढण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यात सातपूर विभागातील १२ मंदिरांचा समावेश आहे. यात बळवंतनगरमधील साईबाबा मंदिर, जिजामाता शाळेजवळील दक्षिणेश्‍वर हनुमान मंदिर, छत्रपती विद्यालयाजवळील खंडेराव महाराज मंदिर, ओमकारेश्‍वर महादेव मंदिर, पपया नर्सरी येथील हनुमान मंदिर, दत्तमंदिर चौकातील महादेव मंदिर, सातपूर गावातील सप्तशृंगीमाता मंदिर, गंगापूर रोडवरील दोन मंदिरे, तसेच श्रमिकनगरमधील शनिमंदिराला सातपूर विभागीय अधिकाऱ्याने नोटीस बजावली असून, पंधरा दिवसांच्या आत मंदिराचे अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.

दरम्यान, श्रमिकनगरमधील शनिमंदिरात संकटांतून वाचण्यासाठी रोज शेकडो नागरिक येतात. मात्र, नोटिशीमुळे शनिमंदिरालाच ग्रहण लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.