नितीन ठाकरेंची सरचिटणीसपदासाठी उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

प्रतापदादा सोनवणेंनी आणीबाणीची आठवण होत असल्याचे ओढले कोरडे

नाशिक - मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज येथील प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या सहविचार सभेत सभापती ॲड. नितीन ठाकरे यांनी स्वतःची सरचिटणीसपदासाठी उमेदवारी जाहीर केली. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी संस्थेच्या कारभारातून आणीबाणीची आठवण होत असल्याचे कोरडे ओढले. तसेच संसदीय पद्धतीच्या कामकाजासाठी आणि सभासदांच्या सन्मानासाठी सर्वांच्या सहमतीने पॅनल निश्‍चित केले जाईल, असा शब्दही त्यांनी दिला.

ॲड. नामदेवराव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. डॉ. विलास बच्छाव, डॉ. अशोक बच्छाव, नारायण कोर, राजेंद्र मोगल, संचालक दिलीप मोरे, मोहनराव पिंगळे, बाळासाहेब कोल्हे आदी उपस्थित होते. हुकूमशाहीने ‘मविप्र’ संस्थेत कारभार सुरू असून, खासगीकरणाच्या दिशेने संस्थेची वाटचाल सुरू आहे, असा आरोप करून सभापती ठाकरे म्हणाले, की सभासदांना संस्थेत सन्मानाची वागणूक मिळत नाही. प्रवेशावेळी सभासदांकडून देणगीची अपेक्षा केली जाते. त्यामुळे आता निवडणुकीत सारी भिस्त पैशांवर आहे. तीन हजार मते विकत घेण्याची भाषा बोलली जाते. मुळातच कायदेशीरपणे सभासद करून घ्यायला हरकत नाही. माझा नवीन सभासदांना विरोध नाही. सभासद आणि त्यांच्या पत्नीचे वैद्यकीय उपचार मोफत व्हायला हवेत. या निवडणुकीत सभासदांची 
 
डॉ. पवारांचे मेहुणे विरोधकांत
संस्थेचे दिवंगत सरचिटणीस आणि माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांचे मेहुणे डी. बी. मोगल विरोधकांच्या गोटात दाखल झाले आहेत. सरचिटणीस नीलिमाताई पवार या बाळासाहेब वाघ यांची भाची, शंकरराव कोल्हे यांच्या कन्या आणि प्रणव यांच्या आई आहेत, असे सांगत श्री. मोगल यांनी श्रीमती पवार कोपरगाव स्टाइल वागतात, असा आरोप केला. डॉ. पवारांनी विरोधकांचा सन्मान केला. आता मात्र सत्य बाहेर येऊ नये, अशी अपेक्षा असल्याचे सांगून, नोकरीचे गाजर दाखवले गेले तरी सभासदांनी चुकीचे पाऊल टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.