कांद्याच्या भावात 300 रुपयांनी उसळी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नाशिक - बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थितीमुळे स्थानिक बाजारपेठेतील कांद्याच्या भावात क्विंटलला सहाशे रुपयांनी घसरण झाली होती. देशाच्या विविध भागांतून मागणी वाढल्याने शुक्रवारी कांद्याच्या भावात क्विंटलला तीनशे रुपयांनी उसळी घेतली. शनिवारपासून (ता. 19) तीन दिवस कांद्याच्या पट्ट्यातील बाजारपेठांमधील लिलाव बंद राहणार आहेत. 

पर्युषण वर्षारंभाच्या पहिल्या दिवसामुळे जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये लिलाव आज बंद ठेवण्यात आले होते. त्याचवेळी बंगळूर, दावणगिरी, कोलकता, चेन्नई, मध्य प्रदेश, ओडिशामधून मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात वाढ झाल्याचे व्यापारी नितीन जैन यांनी सांगितले. दरम्यान, पूरपरिस्थितीत रस्त्यात अडकून पडलेल्या पाचशे ट्रकपैकी कांद्याचे अडीचशे ट्रक सकाळपर्यंत बांगला देशच्या सीमेपर्यंत पोचले होते. लासलगाव बाजार समितीमध्ये क्विंटलभर कांद्याचा सरासरी भाव दोन हजार 150 रुपये इतका निघाला. दोन दिवसांपूर्वी एक हजार 851 रुपये क्विंटल भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. 

कांद्याचे भाव रुपयांमध्ये 
(क्विंटलचा सरासरी) 
बाजारपेठ बुधवारी (ता. 16) आज 
आग्रा 2 हजार 410 2 हजार 420 
अहमदाबाद 1 हजार 800 2 हजार 
अजमेर 2 हजार 2 हजार 100 
गोरखपूर 2 हजार 250 2 हजार 300 
जळगाव 1 हजार 500 1 हजार 450 
कोल्हापूर 1 हजार 800 2 हजार 
पाटणा 2 हजार 400 2 हजार 350 
पुणे 2 हजार 2 हजार 
सुरत 2 हजार 50 2 हजार 150 
येवला 1 हजार 950 2 हजार 150