मुक्त विद्यापीठाचा उद्या केंद्रीय युवक महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नाशिक - शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव होत आहे. हा महोत्सव मंगळवारी (ता. 31) सकाळी अकराला येथील विद्यापीठाच्या मुख्यालयात होत असून, त्याचे उद्‌घाटन अभिनेत्री नेहा जोशी हिच्या हस्ते होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन अध्यक्षस्थानी असतील. विभागीय पातळीवरील स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा केंद्रीय महोत्सवात सहभाग असेल. एकांकिका, मूक अभिनय, विडंबन नाट्य, गायन, वादन, चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी, वादविवाद, नृत्य, वक्तृत्व आणि प्रश्नमंजूषा अशा विविध 18 प्रकारांत राज्यातील 140 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.