रुग्णांचे नुकसान टाळण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी गरजेची

रुग्णांचे नुकसान टाळण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी गरजेची

फार्मसी पदवीधर लोकप्रतिनिधींचा औषध निर्माता संघटनेतर्फे सत्कार

नाशिक: फार्मसी व कॉस्मेटिक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्यास रुग्णावर होणारा औषधांचा अतिरिक्त वापर व त्यामुळे होणारे दुष्परीणाम या पासून रुग्णांची सुटका होऊ शकते. आपल्या देशात उत्पादित होणारी औषधे फार्मसी कायद्यानुसार उत्पादित करून त्यांची गुणवत्ता तपासून प्रामाणिकपणे रुग्णापर्यंत पोहचविल्यास रुग्णांचे आर्थिक नुकसान व फसवणूक या बाबींना आळा बसणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

जागतीक फार्मसी दिनाचे औचित्य साधून रावसाहेब थोरात सभागृहात महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेतर्फे फार्मसी पदवीधर असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सागंळे व आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्न व औषध आयुक्त असताना या विभागाला शिस्त लावणारे विभागीय आयुक्त महेश झगडे यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

जागतीक फार्मसी दिनानिमित्त आज अवयव दान नोंदणी शिबिर, रक्तदान शिबीर व रक्त तपासणी शिबिर, नेत्रतपासणी व नेत्रदान शिबिर आदी कार्यक्रम घेण्यात आले. शिबिरात 60 कर्मचाऱ्यांनी नेत्रदानाचा संकल्प करून नोंदणी केली. नेत्र तपासणीचा 467 कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला तर 51 जणांनी रक्तदान केले. विविध तपासणीचा 702 कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. अर्थ व बांधकाम सभापती मनिषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोसकर, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी अवयवदानासाठी अर्ज नोंदणी केली. गुणवंत औषध निर्माण अधिकारी म्हणून मनोज अमृतकर, सुनील जगताप व शीतल जाधव यांना गौरवण्यात आले. सुमती ठाकुर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या वेळी उपाध्यक्षा नयना गावित, सभापती यतींद्र पाटील मनीषा पवार, अर्पणा खोसकर, सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिणा, आरोग्य उपसंचालक डॉ. लोचना घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, डॉ. सुरेश जगदाळे, डॉ.सुशील वाघचौरे, प्रदीप चौधरी, अविनाश देशमुख, विजय देवरे, दशरथ वाणी, सचिन अत्रे, हेमंत राजभोज, माधवी पाटील, जनार्दन सानप, तुषार पगारे, शिवाजी मुसळे, अजित गायकवाड, मधुकर आढाव, शोभा खैरनार, विजयकुमार हळदे उपस्थित होते. जी पी खैरनार यांनी प्रास्ताविक केले. सोनाली तुसे यांनी आभार मानले.

माझ्या औषध निर्माण शास्रातील कुटुंबियांकडून झालेल्या सन्मानामुळे विशेष आनंद होत आहे. फार्मसिस्ट या नात्याने आपल्या मार्फत व जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकास न्याय देण्याची व मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी पार पाडावी.
- शीतल सांगळे, अध्यक्षा जिल्हा परिषद नाशिक.

अनेक वर्षांपासून मी फार्मसी महाविद्यालयात अध्यापन करीत आहे. माझे विध्यार्थी या सभागृहात शासकीय सेवेतील औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असल्याबद्दल विशेष आनंद होत आहे. औषध निर्मात्यांना रुग्णांची सेवा करण्याची मोठी संधी मिळते, त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडावी.
- देवयानी फरांदे, आमदार, नाशिक (मध्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com