पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नाशिक - पोलिस कर्मचारी दीपक दगडू बारहाते (मूळ रा. धुळगाव, ता. येवला, जि. नाशिक) यांनी आज सायंकाळी पोलिस मुख्यालयातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बारहाते शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात चालक पोलिस या पदावर कार्यरत होते. ते रात्रपाळी करून आज सकाळी नऊला घरी आले होते. त्यांनी गळफास घेतल्याची बाब लक्षात येताच त्यांना तत्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. नाशिक ग्रामीण पोलिस दलातून निवृत्त झालेले दगडू बारहाते यांचे ते पुत्र होत. 

घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. बारहाते यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत नोंद झाली आहे.