दुबईच्या मराठीजनांसाठी 'ऍप'द्वारे पूजा-विधींची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पाटील दांपत्यांचा पुरोहित अन्‌ यजमानांना सांधणारा "स्टार्टअप'

पाटील दांपत्यांचा पुरोहित अन्‌ यजमानांना सांधणारा "स्टार्टअप'
नाशिक - पालघरमधील मेकॅनिकल अभियंता मकरंद पाटील आणि चार्टर्ड अकाउंटंट प्राजक्ता यांचा "बिझनेस कन्सल्टिंग' व्यवसाय असून त्यांना दीड वर्षांपूर्वी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशामध्ये असणाऱ्या भारतीय अन्‌ मराठमोळ्या कुटुंबांसाठी पूजा-विधीची व्यवस्था करण्याची कल्पना सूचली आणि त्यांनी "माय ओम नमो' ऍप विकसित केला.

दुबईमध्ये मागील जूनमध्ये पुरोहित अन्‌ यजमानांना सांधणारा "स्टार्टअप' उपक्रम सुरू करण्यात आला. पुढच्या वर्षी हा उपक्रम ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडामध्ये नेण्याचा मकरंद यांचा मानस आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रदिनी मकरंद यांचा तरुण उद्योजक म्हणून "मॅक्‍सल' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. ऍपच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिकमध्येसुद्धा पूजा-विधीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुगल आणि ऍपल प्लेस्टोअरच्या माध्यमातून हे "ऍप' डाउनलोड करता येते. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुरोहितांना नोंदणी करावी लागतात. आतापर्यंत दीडशे पुरोहितांनी नोंदणी केली असून, दोन हजार पुरोहितांनी उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यजमानांनी पुरोहितांच्या नावावर क्‍लिक केल्यावर पुरोहितांना मोबाईलवर मेसेज जातो. दोघांमध्ये वेळेचे सूत्र जुळताच, तीस सेकंदांत पूजा "बुक' होते.