जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या वृद्ध कैद्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

नाशिक: नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 71 वर्षीय वृद्ध कैद्याने रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली असून, मोहनगिरी गुरुजी दयागिरी उर्फ गौतम काशिनाथ जोशी (71, मूळ रा. आव्हान आखाडा, ता. हलदर, जि. सुरेंद्रनगर, उत्तरप्रदेश) असे मृत कैद्याचे नाव आहे.

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदीवान मोहनगिरी गुरुवारी (ता. 12) मध्यरात्री साडेबारा एकच्या सुमारास रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात गेला आणि पांघरण्यासाठी दिलेली चादर फाडून तिच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदरची बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

बंदीवान मोहनगिरी याच्यावर किनवट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कारागृहात महंत म्हणूनच तो परिचित होता.

टॅग्स