पुण्याचा प्रवास बुधवारपासून 'एसी शिवशाही'तून

पुण्याचा प्रवास बुधवारपासून 'एसी शिवशाही'तून

नाशिक - वर्षभर प्रवाशांची मोठी गर्दी असलेल्या नाशिक- पुणे मार्गावर येत्या बुधवार (ता. 25)पासून वातानुकूलित (एसी) शिवशाही बससेवा सुरू होत आहे. यामुळे या मार्गावरील शिवनेरी व एशियाड बस बंद केल्या जाणार आहेत. शिवशाही बस "एसी' असल्याने शिवनेरीप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधवांसह पत्रकार व अन्य घटकांना प्रवासभाड्यात मिळणाऱ्या सवलतीपासून मुकावे लागणार आहे. या संदर्भातील तांत्रिक अडचण नाशिक विभागातर्फे प्रशासनास कळविण्यात आली आहे; परंतु याबाबत नवीन परिपत्रक निघत नाही, तोपर्यंत या सवलतीपासून लाभार्थ्यांना मुकावे लागेल.

काही दिवसांपूर्वी महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बसगाड्या दाखल झाल्या आहेत. नाशिकच्या वाट्याला 17 शिवशाही बस आल्या आहेत. या सर्व बस नाशिक-पुणे मार्गावर सुरू करण्याचा निर्णय महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे घेण्यात आला. या बसच्या रोज साधारणत: 38 फेऱ्या होतील.
नाशिक-पुणे मार्गावर धावत प्रवाशांचे लक्ष वेधणाऱ्या शिवनेरी बस यापुढील काळात लांब पल्ल्याच्या मार्गांवर सुरू करण्याबाबत नियोजन सुरू आहे. सुरत, अहमदाबादसह नाशिक- शिर्डी- हैदराबाद, कोल्हापूर, सोलापूर या मार्गांवर बस सुरू करण्याबाबत परिवहन महामंडळाचा विचार सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com