पावसाच्या उघडीपीमुळे धरणांमधील विसर्गही घटला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नाशिक - आठवडाभर संततधार सुरू असलेल्या पावसाने आता उघडीप दिली असून, अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने विसर्गही घटला. नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून आज दुपारी सुरू असलेला 15 हजार 248 क्‍युसेक कमी होऊन सायंकाळी तो 11 हजार क्‍युसेकपर्यंत खाली आला होता. दरम्यान, या वर्षी जुलै महिन्यात विक्रमी पाऊस पडल्यामुळे जिल्हा सरासरीच्या 68 टक्के पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या धरणांमध्येही 61 टक्के साठा आहे. जिल्ह्यात आठवडाभर संततधार सुरू होती. त्यानंतर कालपासून पावसाने थोडीशी उघडीप दिली असली, तरी अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत.

नाशिक - आठवडाभर संततधार सुरू असलेल्या पावसाने आता उघडीप दिली असून, अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने विसर्गही घटला. नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून आज दुपारी सुरू असलेला 15 हजार 248 क्‍युसेक कमी होऊन सायंकाळी तो 11 हजार क्‍युसेकपर्यंत खाली आला होता. दरम्यान, या वर्षी जुलै महिन्यात विक्रमी पाऊस पडल्यामुळे जिल्हा सरासरीच्या 68 टक्के पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या धरणांमध्येही 61 टक्के साठा आहे. जिल्ह्यात आठवडाभर संततधार सुरू होती. त्यानंतर कालपासून पावसाने थोडीशी उघडीप दिली असली, तरी अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा, पेठ व नाशिक या तालुक्‍यांत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत.