पावसाची आजही तुरळक हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - काल (ता. 7)पासून सुरू झालेल्या पावसाने आजही जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांत हजेरी लावली. जिल्ह्यात आज सरासरी साडेसात मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कालपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. काल पश्‍चिम पट्ट्यातच हजेरी लावलेल्या पावसाने आज मालेगाव, नांदगाव तालुक्‍यांवर कृपादृष्टी केली. मालेगाव, नांदगाव व चांदवडला दुपारी चांगला पाऊस झाला. त्याखालोखाल नाशिक तालुक्‍यात पावसाने आज दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली.