नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक - महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावत गायब झालेला मॉन्सून आज (शनिवार) पुन्हा धडकला आहे. आज सकाळपासून नाशिक शहर परिसरात धिम्यागतीने पण सातत्याने पाऊस सुरू आहे. 

या पावसामुळे नाशिककर सुखावले आहेत. दरम्यान आज झालेल्या पावसाने ग्रामीण भागात पेरण्यांना वेग येणार आहे. आज सकाळी दहापासूनच पावसाला सुरुवात झाली. दुपारी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. शनिवार असल्याने नाशिककरांनी देखील पावसाचा पुरेपूर आनंद घेतला.

या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवू'
पैशांवरून आईशी भांडण; दहावीतील मुलाची आत्महत्या
जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी​
चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी
काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​
एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे
"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !
भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​
‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​
#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​