रेशन दुकानदारांचा संप अखेर मागे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

नाशिक - रेशन दुकानदारांचा संप मिटल्याने गणेशोत्सवाच्या काळात धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धान्य उचलण्याच्या कमिशनमध्ये वाढ करण्याबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संप मागे घेतल्याचे दुकानदारांनी जाहीर केले आहे.

अंत्योदय (प्राधान्य) शिधापत्रिका धारकांना प्रतिमहिना 35 किलो धान्य वितरीत होते. आता शिधापत्रिकांना आधार कार्ड लिंक करण्यासह "पॉइंट ऑफ सेल' यंत्राद्वारे धान्य वितरित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेत धान्य वितरणापोटीचे कमिशन किती असावे, याविषयी पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदार यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे कमिशन वाढविण्यासह विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा संप सुरू होता. त्यामुळे गणेशोत्सवात धान्य मिळेल का, अशी शंका होती. काल (ता.10) दहाव्या दिवशी संप मागे घेतल्याचे रेशन दुकानदारांच्या संघटनेने जाहीर केल्याने, गणेशोत्सव शिधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.