महसूल कर्मचारी संघटनेचे 10 तारखेपासून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

नाशिक - महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना सरकारने केराची टोपली दाखविल्याने संतप्त झालेल्या महसूल कर्मचारी संघटनेने 10 ऑक्‍टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महसूल कर्मचारी संघटना गेल्या महिन्यापासून सरकारकडे विविध मागण्या करत आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत सरकारने सविस्तर भूमिका मांडत मागण्यांचा विचार होणार नसल्याचे लेखी पत्र दिले.

यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेची बैठक नाशिक येथे झाली. त्यात 10 ऑक्‍टोबरपासून आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.

संघटनेने सरकारच्या 5 ऑक्‍टोबरच्या परिपत्रकाचा निषेध केला. हे परिपत्रक काढण्यापूर्वी संघटनेशी चर्चा केली नाही. सरकारने एकतर्फी निर्णय घेतला असून, तो संघटनेस मान्य नाही. त्यामुळे राज्यात महसूल कर्मचाऱ्यांनी सरकारी निर्णयाविरोधात आंदोलनातून एकजूट दाखवून द्यावी, असा निर्णय झाला. अखेर संघटनेने काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.