नाशिक: 'सकाळ'तर्फे आज स्वच्छतेचा जागर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

कर्मचारी होणार सहभागी, रविवार कारंजा येथेही उपक्रम

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंधरा दिवसांपासून विविध भागांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद देण्यासाठी "सकाळ' माध्यम समुहाने पुढाकार घेतला आहे. उद्या (ता. 1) कालिका माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जाईल.

कर्मचारी होणार सहभागी, रविवार कारंजा येथेही उपक्रम

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंधरा दिवसांपासून विविध भागांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद देण्यासाठी "सकाळ' माध्यम समुहाने पुढाकार घेतला आहे. उद्या (ता. 1) कालिका माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जाईल.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत संकल्पना साकारण्यासाठी "स्वच्छता हीच सेवा' यावर आधारित स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. या उपक्रमात "सकाळ' माध्यम समूह आज उतरणार आहे. उद्या (ता.1) सकाळी आठ वाजता कालिका माता मंदिर परिसरात महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन होईल. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, पश्‍चिम प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील, आरोग्य व वैद्यकीय समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, कालिका माता संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे आदी उपस्थित राहतील.

विविध सामाजिक उपक्रमांमध्ये "सकाळ' कायम अग्रेसर राहिला आहे. स्वच्छतेच्या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी "सकाळ'चे कर्मचारी हातात झाडू घेऊन कचरा संकलित करतील. कालिका माता मंदिर परिसरात उद्‌घाटन झाल्यानंतर गडकरी चौक ते हॉटेल संदीपपर्यंतचा रस्ता स्वच्छ केला जाईल. शहराची व्यापारी पेठ असलेल्या रविवार कारंजा भागातही सकाळी आठ वाजता महापालिकेच्या सहकार्याने "सकाळ'चे कर्मचारी, सामाजिक संस्था, नागरिकांच्या सहाय्याने परिसर स्वच्छ केला जाईल. विजया दशमीनिमित्त कालिका माता मंदिर परिसर तसेच रविवार कारंजा परिसरामध्ये फूल व पूजेचे साहित्यविक्रेते एकत्र येतात. दुसऱ्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने हाच भाग स्वच्छतेसाठी निवडला आहे. "सकाळ'च्या स्वच्छता मोहिमेला साथ देण्यासाठी महापालिकेचे आरोग्य विभागाचे पथक सज्ज झाले आहे. पालिकेच्या पश्‍चिम व पूर्व विभागातर्फे कचरा संकलनासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: nashik news sakal and Awareness of cleanliness