भद्रकाली मंदिरात आज ‘सकाळ कलांगण’

भद्रकाली मंदिरात आज ‘सकाळ कलांगण’

नाशिक - आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ कलांगण’चा १८ वा उपक्रम आज (ता. २४) सकाळी भद्रकाली मंदिरात सुरु झाला.  शहरातील दिग्गज कलाकारांबरोबरच जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंत यात सहभागी झाले.

येवल्याचे प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके, सिन्नरचे गायक व वादक गोपाळ गोसावी, प्रवीण आंबेकर कलेचे सादरीकरण करतील. ‘कावळा’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते श्रीनिवास मोरे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. ‘मविप्र’चे ललित कला महाविद्यालय, के. के. वाघ परफॉर्मिंग आर्टस्‌, दी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे विशेष विद्यार्थी कलेचे सादरीकरण करतील. ज्येष्ठ कलाकार प्रकाश गायकवाड, अरुण भारस्कर, प्राचार्य मकरंद हिंगणे सहभागी होतील.

भद्रकाली मंदिराचे उदयन दीक्षित, अतुल गर्गे, मंदार कावळे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम चव्हाण आदी उपस्थित राहतील. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून या मंदिरात कलेचा जागरा होणार आहे. समजातील सर्वच स्तरांतील नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी दीड वर्षापासून उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठावर अनेक दिग्गजांनी कला सादर केली. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी आठला वेगवेगळ्या ठिकाणी हा उपक्रम घेतला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com